राष्ट्रवादीचे 17 आमदार भाजपच्या संपर्कात, रावसाहेब दानवेंचा दावा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे १७ आमदार भाजपामध्ये येण्यास उत्सुक आहेत. मात्र, त्यांना पक्षात घेताना सामाजिकक समीकरण व राजकीय परिस्थिती विचारात घेऊनच त्यांच्या प्रवेशाचा निर्णय घेतला जाणार असल्याचा दावा केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबाद येथील एका कार्यकर्त्यात ते बोलत होते.

विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आजी माजी आमदारांना आपल्या पक्षात ओढण्याची चढाओढ भाजपा आणि शिवसेनेत सुरु आहे. केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाने महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविले आहे.

असे असले तरी दानवे यांचे अजून राज्यातील राजकारणावर बारीक लक्ष आहे. त्यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसचे १७ आमदार भाजपामध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या या वाक्याने कार्यक्रमातच एकच खळबळ उडाली.

त्यामुळे कार्यकर्त्यांना समजावून सांगताना ते म्हणाले, भाजपामध्ये सध्या सुरु असलेल्या इनकंमिगमुळे जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची काही एक गरज नाही. पक्षात कोणी आले तरी आपले काम एकनिष्ठेने सुरुच ठेवायचे असते. एक दिवस तुम्हाला नक्कीच न्याय मिळत असतो.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like