‘महाविकास’मध्ये ‘तणाव’; राष्ट्रवादीचं मिशन 2024 तर काँग्रेसचा स्वबळाचा नारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात भाजपाला मागे टाकून शिवसेना, (NCP)  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षाचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. मात्र मागील काही दिवसापासून राज्यात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय अंतर्गत कणकण दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान
अडचणीच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांसमोर नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त प्रसारित झालं होतं.

महाविकास आघाडीमध्ये असे काही विविध मुद्यावर धुसफूस सुरु असताना एकीकडे शिवसेनेचे
काही नेते
आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष टिकणार असल्याची स्पष्टोक्ती देत आहेत.

संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अहो, शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा’

कालच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त याबाबत भाष्य केलं होतं.

तसेच मराठा आरक्षण आणि अन्य प्रलंबित मागण्या घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र
मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते.

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यामध्ये पर्सनल बैठक झाली.
याच मुद्यावरून महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पक्ष एकत्र येणार का? अशा चर्चा घडू लागल्या.

आयुर्वेदिक पध्दतींनी वाढवा ब्रेन पॉवर, ‘हे’ ७ उपाय करून फरक जाणून घ्या

दरम्यान, मोदी-ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत.

आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नसलो तरी आमचं नातं संपलं नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरून महविकास आघाडी मध्ये चर्चेला उधाण आलं.

काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त शरद पवार यांनी सवांद साधतेवेळी शिवसेना हा विश्वासदायक पक्ष आहे.

असं म्हणत महाविकास आघाडी सरकार हे 5 वर्ष टिकणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

YogaDay2019 : योगाभ्यास करण्यापूर्वी प्रथम वज्रासन शिका

तसेच मुख्यतः म्हणजे पुढील निवडणुका एकत्र लढतील आणि जिंकतील असा ठाम विश्वास देखील
शरद पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला काँग्रेसचा स्वबळाचा नारा दिला आहे.

नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडत आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य
संस्था आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे दर्शविले.

राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे त्यावेळी बसून निर्णय होईल. मात्र, आता आमच्यासमोर कुठलाही प्रस्ताव नाही असे पटोलेंनी सांगितले आहे.

तसेच आमच्या मित्रपक्षाचे काय प्लॅनिंग आहे. याबाबत कल्पना नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केलं. यामुळे अनेक चर्चा रंगल्या.

संजय राऊत यांनी म्हटलं होत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील आणि भाजपाचे सर्वात मोठे नेते आहेत.

मागील सात वर्षात भाजपाला राष्ट्रीय पातळीवर यश मिळालं ते मोदींमुळेच.

प्रत्येक पक्षाला मोठं व्हायचं आहे.

त्यांचा मुख्यमंत्री असावा असं वाटतं असं राऊत यांनी म्हटलं आहे. या दरम्यान, पश्चिम बंगालच्या
निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी निवडणुकीचं काम करणार नसल्याचं म्हटलं होत.

मात्र प्रशांत किशोर यांची शरद पवारांसोबत भेट घेतल्याने, ही मिशन 2024 तर नाही ना अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगात असल्याचं चित्र दिसत आहे.

परंतु, अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हणाले, पवार साहेब अनेकांना भेटत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची भेट होत असते तशीच ही भेट आहे, अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

हे देखील वाचा

Gautam Adani Income | ‘बुलेट’च्या स्पीडनं संपत्तीत वाढ ! गौतम अदानी यांनी यावर्षी दररोज कमावले 2000 कोटी रुपये, ‘या’ कंपन्यांमुळे मोठी कमाई

 

‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्‍यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या

 

Pune News | मुलगा होत नसल्याने आत्महत्येस केलं प्रवृत्त, माहेरच्यांनी पतीच्या घरासमोर जाळला महिलेचा मृतदेह, तिघांविरोधात FIR

 

COVID-19 : कोरोनाची ‘सौम्य’ लक्षणे गंभीर संसर्गात बदलण्यापासून रोखण्यासाठी ‘या’ चुका टाळा, जाणून घ्या

 

Woman Care | जर ‘मेनोपॉज’ येणार असेल तर काय खावे आणि काय टाळावे ‘हे’ जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  NCP | ncp 2024 after sharad pawar statement shivsena congress nana patole says we will fight own