#Loksabha : राष्ट्रवादीकडून 5 जणांची दुसरी यादी जाहीर ; पार्थ पवार मावळ मधुन लढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. काल (गुरुवार) राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही 11 उमेदवार जाहिर केले होते. आज जाहिर केलेल्या यादीत 5 जणांचा समावेश आहे.

सर्वांचे लक्ष लागलेल्या मावळ मतदार संघातून अखेर पार्थ अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान,  नगर दक्षिण आणि माढ्यातील सस्पेन्स अद्यापही कायम आहे.मतदारसंघ आणि अधिकृत उमेदवाराचे नाव पुढील प्रमाणे :- मावळ – पार्थ अजित पवार, शिरुर – अमोल कोल्हे , नाशिक – समीर भुजबळ, बीड – बजरंग सोनवणे, दिंडाेरी – धनराज महाले.