Video : मुख्यमंत्र्यांच्या विद्यापीठातील कार्यक्रमात विद्यार्थाने घातला ‘गोंधळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुख्यमंत्र्यांच्या कार्य़क्रमात राष्ट्रवादीच्या कार्य़कर्त्यांनी गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देण्यासाठी गोंधळ सुरु केला. मुख्यमंत्री महोदय, आता तुम्ही तरी आम्हाला वाचवा, आमच्याशी बोला आशा आशयाचे बॅनर यावेळी झळकावण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या दिशेने बॅनर झळकावणाऱ्या सोमनाथ लोहार या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी जेवणामध्ये आळ्या निघाल्या होत्या. त्यावेळी विद्यापीठातील रिफेक्टरीमध्ये धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मागील काही महिन्यांमध्ये विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत यासाठी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले असल्याचे आंदोलनकर्ता सोमनाथ लोहार याने म्हटले आहे.

सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत

‘या’५ अभिनेत्रीच्या ‘सिंदूर’ लुकची ‘कमाल’ ; दिसतात ‘सुंदर’ आणि ‘संस्कारी’

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’