शिवसेना-राष्ट्रवादीचं 50-50 ठरलं ? आता सेनेचा आणि नंतर NCP चा ‘मुख्यमंत्री’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीमध्ये आज आनेक राजकीय घडामोडी घडल्या. यामध्ये शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झाली बैठक. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुरु झालेला बैठकांचा सिलसिला रात्री उशीरापर्य़ंत सुरु होता.

या दोन्ही पक्षातील बैठका आणि चर्चांचा सिलसिला काही काळ तरी असाच सुरु राहणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील काही दिवस अशी चर्चा राहील. दोन्ही काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या चर्चामध्ये अनेक गोष्टीवर एकमत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. यामध्ये पहिले अडिच वर्षे शिवसेनेचा तर नंतरचे अडीच वर्ष राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल असे ठरल्याचे सुत्रांकडून सांगितले जात आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाला काँग्रेसचा आक्षेप नाही. त्यामुळे राज्यामध्ये लवकरच स्थिर सरकार येईल असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या घरी तीन तास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेऊत शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकिची माहिती दिली. त्यानंतर ते नेते पुन्हा शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत. तर गुरुवारी सकाळी संजय राऊत हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्रिपद शिवसेना आणि राष्ट्रवादीत अडीच अडीच वर्ष आणि पूर्ण पाच वर्ष काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्यावर सर्वच पक्षांमध्ये एकमत झालं असंही सांगितलं जातंय. त्यामुळे सत्तेचा मार्ग मोकळा झाला तरी पुढच्या चर्चेच्या फेऱ्यांवर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. काँग्रेस सत्तेत सहभागी होणार असला तरी काही अटींवर पुढे जा असा संदेत सोनियांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. दोन भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येत असल्याने काँग्रेसालाही आपल्या प्रतिमेची काळजी आहे. त्यामुळे सरकार बनविण्याची घाई करू नका प्रत्येक गोष्ट शांतपणे विचारपूर्वक करा असे निर्देशही सोनियांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिले आहेत.

Visit :  Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like