आईला भेटा, बोला पण ही नाटकं कशाला ? मोदींवर पवारांचा हल्लाबोल

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभचे दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला मोजकेच दिवस शिल्लक राहिले असताना प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. मोदींनी सभांमधून पवार घराण्यावर टीका करायला सुरुवात केल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून देखील मोदींवर टीका केल्या जात आहेत. इंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेसची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना अजित पवार यांनी मोदींवर कडाडून टीका केली. ‘मोदी प्रसिध्दीसाठी उतावीळ आहेत. एवढेच नाही तर प्रसिद्धीसाठी ते आपल्या आईला देखील वेठीस धरतील’ असे पवार यावेळी बोलताना म्हणाले.

इंदापूरातील सभेत बोलताना पवार म्हणाले, ” एखादा व्यक्ती आपल्या आईला भेटला असता नमस्कर केला असता, तब्येतीची विचारपूस केली असती आणि निघून गेला असता. पण दुसरे कोण इथले असते तर सर्वात आधी मीडियाला बोलावलं असतं , मग दोन खुर्च्या घराच्या बाहेर ठेवल्या असत्या. मग एकावर स्वतः बसले असते आणि दुसऱ्यावर आईला बसवलं असतं. आणि तिला सांगितले असते मला जरा गोंजार… मग आई गोंजारतेच ना मुलाला. मग लगेच फोटो … मग लगेच सोशल मीडियावर, बघा आईला किती प्रेमाने भेट चालली आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मोदींवर हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना पावर म्हणाले आईला भेटा बोला पण ही नाटकं कशाला ? असा सवाल करीत अजित पवार यांनी इंदापूर येथील सभेत मोदींवर निशाणा साधला. त्यांच्या या सभेतील भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.