Lockdown च्या गोंधळावर अजित पवारांचे रोखठोक मत, म्हणाले – ‘सरकार कोणाचंही असलं तरी मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी (दि. 3) राज्यातील 18 जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवल्याची घोषणा केल्यानंतर राज्यात उडालेल्या गोंधळावरुन विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. वडेट्टीवारांच्या घोषणेनंतरसारे निर्बंध शिथिल झाले, असे चित्र निर्माण झाले होते. पण असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण CMO ने दिले. दरम्यान या सर्व गोंधळावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. शेवटी सरकार कोणाचेही असले तरी मुख्यमंत्री सांगतील तो अंतिम निर्णय असतो, असे पवारांनी स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) रायगडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. पवार म्हणाले की, अनलॉकबाबत पूर्णपणे सुसंवाद आहे. ज्या दिवशी कोरोना आला तेव्हापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांसमोर येतात. त्यानंतर मग अनेकदा आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे भूमिका मांडत असतात. विजय वडेट्टीवार यांच्याकडून तत्वतः हा एक शब्द राहून गेला होता त्यामुळे गैरसमज झाला होता असे स्पष्टीकरण पवार  यांनी दिले आहे.

मंत्र्यांना शिस्त लावाः फडणवीस
ज्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडून कोणतेही वक्तव्य येत नाही. त्यांच्यापूर्वी 5 मंत्री बोलतात. प्रत्येक मंत्री जाहीर करतो आणि ही घोषणा मुख्यमंत्री करतील असे सांगतो. प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे कालचा गोंधळ जरा जास्तच झाला आहे. यापूर्वीही अनेकदा गोंधळ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावावी. बोलण्यावर बंधनं आणू नये पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचे म्हणणं आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

READ ALSO THIS :

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत

भाडेकरूंसाठी खुशखबर ! 2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये घरमालक

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलने मोडले सर्व विक्रम, सतत होतेय महाग, जाणून घ्या आजचे दर

मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा Ration Card; जाणून घ्या ऑनलाइन अप्लाय करण्याची संपूर्ण प्रोसेस