NCP Ajit Pawar On CM Eknath Shinde Group | ज्या-ज्यावेळी शिवसेना फुटली तेव्हा निवडणुकीत आमदार पडले, राणे तर पोटनिवडणुकीतही पडले; अजित पवारांनी डिवचले

कोल्हापूर : NCP Ajit Pawar On CM Eknath Shinde Group | ज्या ज्यावेळी शिवसेना (Shivsena) फुटली, त्या त्यावेळी निवडणुकीत आमदार पडलेत. हा इतिहास आहे. नारायण राणे तर पोटनिवडणुकीतही पडले, असा टोला अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP Leader And Union Minister Narayan Rane) आणि शिंदे गटाला लगावला (NCP Ajit Pawar On CM Eknath Shinde Group). ते आज कोल्हापुरात (Kolhapur News) पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापुरात गद्दार लोकं निघाली आहेत. कोल्हापुरात त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असेही ते म्हणाले. (Maharashtra Politics)

शिंदे गटाच्या बीकेसीवरील (BKC Ground, Mumbai) दसरा मेळाव्यासाठी (Eknath Shinde Group Dasara Melava) अवाढव्य खर्च करण्यात आल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. याबाबत अजित पवार शिंदे गटावर टीका करताना म्हणाले की, आम्ही तुमच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. 40 आमदार पैशाचा पाऊस पाडत आहेत.

अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे म्हणत होते की, लोक स्वतःहून आले. मग भाषणावेळी उठून का जाते होते.
सभेला कोट्यवधींचा खर्च केला. हा पैसा कुठून आला? शिंदेसाहेब हा महाराष्ट्र आहे, असे इथे चालणार नाही.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाला लोकांमधून समोरून प्रतिसाद मिळत नव्हता.
मात्र, उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला समोरून प्रतिसाद मिळत होता, असे पवार म्हणाले.

दरम्यान, शिंदे गटाच्या बीकेसीवरील दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून लोकांना आणण्यासाठी एसटी बसेस
आणि खासगी गाड्या, तसेच मेळाव्याचे प्रमोशन, जाहिराती, लाखो लोकांची खाण्याची सोय आदींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले.
नोंदणी नसलेल्या एका पक्षाकडे इतकी रक्कम कशी आली? त्यांच्या वतीने कोणी खर्च उचलला?
त्यांच्या पैशाचा स्रोताबाबत मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट व आयकर कायद्याच्या तरतुदी अंतर्गत चौकशी करण्याची मागणी
करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल करण्यात आली आहे.
यामुळे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

Web Title :-  NCP Ajit Pawar On CM Eknath Shinde Group | ncp ajit pawar reaction and warn eknath shinde group spending crore of rupees on dasara melava at bkc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा