अजित पवारांचे राज ठाकरेंबद्दल ‘खळबजनक’ विधान

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – सत्ताधारी पक्षाकडून पैशांची आणि चौकश्यांची भीती दाखवत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीची चौकशी झाल्यापासून त्यांचे बोलणे कमी झाले आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. कोहिनूर मिलप्रकरणात राज ठाकरे यांची ईडीने चौकशी केली होती. सरकार विरोधात भूमिका घेतल्याने त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असल्याचा आरोप मनसेने केला होता.

ईडीकडून चौकशी झाल्यानंतर सरकारने कितीही चौकश्या लावल्या तरी माझा आवाज बंद होणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होते. मात्र, आता अजित पवार यांनी राज ठाकरे चौकशीनंतर बोलायचे कमी झाले असल्याचे विधान करून खळबळ उडवून दिली आहे. तर तीन पिढ्या सरकारमध्ये राहून मंत्रीपद देऊनही काही लोक पक्ष सोडून जात असल्याचे सांगत त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला.

अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो. मग कितीही किंमत मोजावी लागली तरी तो शब्द पाळतो. हर्षवर्धन पाटील खोटे आरोप करत आहेत. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असा शब्द दिला होता. असा खुलासा करत अजित पवार यांनी काँग्रेस सोडणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना फटकारलं.

आरोग्यनामा ऑनलाइन –

You might also like