खा. उदयनराजे, सुनील तटकरे पक्ष सोडण्याच्या चर्चेवर अजित पवारांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षांतर करत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर, सुनील तटकरे यांच्यासह अनेकांच्या नावांची चर्चा आहे. या सगळ्या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पक्षांतराविषयी अजित पवार म्हणाले की, ‘वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून जात असतात. चौकशीच्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी किंवा सरकारकडून काही फायदा मिळवण्यासाठी पक्ष सोडून जात असतात. काहीजण त्यांच्या कुठल्या संस्था अडचणीत असल्यामुळे मदत पाहिजे असते त्यामुळे पक्ष सोडत असतात. तर काहीजणांना सरकारचा वरदहस्त पाहिजे असतो म्हणून ते पक्ष सोडून जात असतात. लोकसभेच्या निकालामुळे काहीजण स्वार्थी विचार पक्षांतर करत असतात. अर्थात पक्ष सोडून जाणाऱ्यालाही त्याचा अधिकार आहे. आपण कोणालाही बांधून ठेवू शकत नाही. ‘

राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पक्षांतर केले असून काही नेते युतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर आणि अजित पवार यांचे नातेवाईक असणारे पद्मसिंह पाटील देखील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. तसेच कोकणातील नेते सुनील तटकरे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. याशिवाय माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे, तसच बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल पक्षांतर करणार असल्याची चर्चा आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like