उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेव्हणे अमरसिंह पाटील यांचे निधन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेव्हणे आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे लहान भाऊ अमरसिंह पाटील (वय- 50) यांचे पुण्यात निधन झाले. अजित पवार यांचे ते सख्खे मेव्हणे होते. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे ते सख्खे लहान भाऊ होते. मागील अनेक वर्षापासून ते पुण्यात वास्तव्यास होते.

अमरसिंह पाटील यांना एका आजाराने ग्रासले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या डोक्यावर अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून ते अनेक दिवस अतिदक्षता विभागात होते. प्रदिर्घ आजाराने अखेर आज (शनिवार) पहाटे त्यांचे पुण्यात निधन झाले. एक व्यासंगी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय होता. शेती हा त्यांचा आवडीचा विषय होता. काही काळ त्यांनी शेतीपुरक व्यवसाय देखील केला होता. त्यांचे वाचन दांडगे होते. एक व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

सरळ व मनमिळावू स्वभाव आणि मार्गदर्शन रुपात असलेले अमरसिंह हे काका म्हणून परिचित होते. त्यांनी तेर गावचे पाच वर्षे सरपंचपद देखील भूषवले होते. अमरसिंह पाटील यांच्या अशा अकाली जाण्याने तेरच्या डॉ. पाटील कुटुंबीय आणि सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like