‘दिलेरखानच्या ‘गोटात’ संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना ‘पाठवण्यात’ आलं होतं’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीशी बंडखोरी करत अजित पावर यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. यानंतर घडलेल्या घडामोडीनंतर अजित पवार पुन्हा स्वगृही परतले. अजित पवार यांच्या पुन्हा परत आल्याने पाक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पक्षातील नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. तर दुसरीकडे अजित पवारांनी भाजपसोबत जाणं शरद पवारांची खेळी होती असा दावा केला जात आहे. राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी शरद पवारांनी अजित पवारांना भाजपला पाठिंबा देण्यास सांगितले असणार असे मत अनेकजण व्यक्त करत आहे. मात्र, हे सर्व दावे समर्थकांकडून करण्यात येत असून राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियातून त्यांचे स्वागत केले. तर अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे भाजपला सत्तास्थापन करता आली नसल्याने देवेंद्र फडणवीस यांचे अनेक मीम्स व्हायरल झाले. अनेकांनी फेसबुकवर पोस्ट करुन अजित पवारांना पाठिंबा दिला. त्यातच एक पोस्ट अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या एका फेसबुक पेजवर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहण्यात आले आहे की, ‘दिलेरखानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना पाठवण्यात आले होते’. ही पोस्ट शेअर करताना शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

जय पवार यांच्या फेसबुक पेजवरून व्हायरल झालेली पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच युजर्सकडून ही पोस्ट शेअर करण्यात येत आहे. या पोस्टच्या माध्यमातून शरद पवारांनी भाजपविरोधात मोठी खेली केल्याचा दावा केला जात आहे. अजित पवारांच्या भूमीकेला तुमचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे असे शरद पवारांना विचारले असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. तर संजय राऊत यांनी सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले असल्याचे सूचक विधान केले होते.

Visit : Policenama.com