Shiv Sena and NCP । ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेस (Congress) स्वबळावर लढेल असा नारा दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्यात याच मुद्यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत. त्याचबरोबर काँग्रेस (Congress) स्वबळावर आगामी निवडणुका लढवत असेल तर महाविकास आघाडीतील उर्वरित दोन पक्ष अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Shiv Sena and NCP ) हे पक्ष एकत्र निवडणूक लढवेल. याबाबत भूमिका शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखातुन मांडण्यात आली. या भूमिकेनंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही आपली भूमिका मांडली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) 3 पक्ष एकत्र आहेत आणि या तीनही पक्षांनी एकत्र रहायला प्राधान्य दिलं पाहिजे.
परंतु, त्यामधूनही एखाद्या पक्षाची स्वबळावर निवडणूक लढायचं इच्छा असेल तर उर्वरित 2 पक्ष एकत्र राहतील.
या दृष्टिकोनातून सामनामध्ये मत व्यक्त केलेलं दिसतंय.
असे मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच ही महाराष्ट्रातील जनतेची तशी इच्छा दिसतेय, असे देखील पाटील (Jayant Patil) यांनी यावेळी म्हटलं आहे.

pune municipal corporation | भविष्यात कचरा वाहतुकही ‘ई-वाहना’तून ! प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू

पुढे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (नाना पटोले) (Nana Patole) सध्या स्वबळावर निवडणूक लढवायचं म्हणतायत.
पक्ष वाढवण्यासाठी कदाचित ते म्हणत असतील. परंतु, शेवटी प्रत्येक पक्षाचं बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे.
त्यामुळे तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटीत काम करणं अपेक्षित आहे.
ते आज जरी असं म्हटलं तरी निवडणुका जवळ आल्यावर ते कदाचित वेगळा विचार करू शकतील.
मात्र, त्यांनी वेगळा विचार केलाच नाही तर समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील.
असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

या दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या (Nationalist Congress) वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान बोलताना महाराष्ट्रात आगामी लोकसभा (lok sabha) आणि विधानसभा (Assembly) निवडणूक महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र लढवेल अशी भूमिका मांडली होती.
परंतु, त्यानंतर काँग्रेसने स्वबळाचा नारा देणं सुरू केलं आहे.
आगामी निवडणुकीत काँग्रेस (Congress) स्वबळावर लढण्यावर ठाम राहिला तर राष्ट्रवादी  आणि शिवसेना (Shiv Sena and NCP) एकत्र आलेले दिसतील.

Wab Title : ncp also ready to contest with shivsena in future said minister jayant patil

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ministry of Indian Railways । 73 हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये; रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय

pune municipal corporation | ड्युटी अवर्समध्ये महापालिका करणार कर्मचार्‍यांचे ‘ट्रॅकींग’ ! काम चुकारांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न