आदित्य ठाकरेंच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा ‘निशाणा’ !

पुणे : पोलीसानामा ऑनलाईन – सध्या विधानसभा निवडणुकांसाठी वातवरणाची तयारी केली जात आहे. त्यासाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी जन आशिर्वाद यात्रा काढली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी आदित्य ठाकरेंवर या यात्रेवरून निशाना साधला आहे.

विधानसभेपूर्वी यात्रा काढण्याऐवजी सत्तेत आल्यावर ही यात्रा काढायला हवी होती. त्यानिमित्ताने कामे काय करायची हे समजले असते. तर मधल्या काळात यात्रा काढली असती तरी तेथील कामांचे मुल्यांकन करता आले असते, असं डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

शनिवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा झाली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभासाठी डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. या समारंभानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

आदित्य ठाकरे यांनी ऐन विधानसभेच्या तोंडावर ही यात्रा काढली आहे. त्याऐवजी त्यांनी सत्तेत आल्यानंतर ही यात्रा काढली असती तर त्यांना काम कसं करावं हे समजलं असतं. किंवा मध्यंतरी काढली असती तर कामांचं मूल्यांकन करता आलं असतं, असं त्यांनी म्हटलं. तर आपल्या संस्कृतीत पिक तयार झाल्यावर कुणी दावा करायला आलं तर ते मान्य होत नाही, असा टोमणाही कोल्हेंनी यावेळी लगावला.

तसंच पत्रकारांशी बोलताना कोल्हे यांनी आदित्य ठाकरेंसह मोदी सरकारवरही निशाणा साधला. भाजप सरकारकडून जनतेचा प्रचंड भ्रमनिरास झालाय. २०१४ मध्ये कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, असे विचारणाऱ्यांना आरशात उभे राहिल्यावर स्वतःलाच आपण कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असे विचारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोणतेही नेते कार्यकर्ते त्यांच्याकडे जाण्याऐवजी पवारसाहेब, अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षांतर करणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

आरोग्यविषयक वृत्त