‘ट्रोलिंगसाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेनं प्रचंड Fake अकाऊंट तयार केलीत’

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला आदर्श मानत त्यांच्याप्रमाणे फडणवीस हे नेहमी सोशल मीडियावर नागरिकांच्या संपर्कात असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. याविषयी एका मुलाखतीत त्यांना विचारले असता त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फेक अकाऊंट बाबत माहिती दिली दिली.तसेच राष्ट्रवादी अन् शिवसेनेची प्रचंड फेक अकाऊंट असल्याचे त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत अनेक मुद्यांवर भाष्य केलं. राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती, राजकारण, देशाची आर्थिक परिस्थिती आणि सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंगबाबत त्यांनी मनमोकळे पणाने उत्तरे दिली.

सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण फॉलो करता, पण नरेंद्र मोदी कधीच कुणाला ब्लॉक करत नाहीत. मग आपण सोशल मीडियावर काही जणांना का ब्लॉक करता ? यावर बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही कधीच कुणाला ब्लॉक करत नाही. मात्र, फेक अकाऊंटच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक ट्विट किंवा पोस्टवर जाणीवपूर्वक गचाळ भाषेत, वाईट आणि द्वेषात्मक कमेंट करण्यात येतात.

त्यामुळे आमच्याकडून केवळ अशा फेक अकाऊंटलाच ब्लॉक करण्यात आले आहे. वैचारिक पातळीवर चर्चा असेल, खरं अकाऊंट असेल तर आम्ही उत्तर देऊ, मुद्दा पटवून सांगू. मात्र फेक अकाऊंटद्वारे नाहक वाईट आणि गलिच्छ टिप्पण्णी करणे योग्य नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर 1.5 लाख फेक अकाऊंट आहेत. काँग्रेसचे फेक अकाऊंट जास्त नसून राष्ट्रवादी आणि शिवसेनेची प्रचंड फेक अकाऊंट असल्याचे फडणवीस यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितले.