राष्ट्रवादीच्या 40 ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर !

मुंबई : पोलीसनामा, ऑनलाइन – राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली आहे, यात विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूकीनिमित्त सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी घोषित केली आहे. कालचा उमेदवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादीने यंदा प्रचारांसाठी आपली स्टार प्रचाराकांची यादी जाहीर केली आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, जयंत पाटील यांच्यासह एकूण 40 जणांचा समावेश आहे.

यंदा राष्ट्रवादीकडून जोरदार प्रचार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठे शक्ती प्रदर्शन करुन दाखल केला. अजित पवार यांच्या विरोधात बारामतीतून भाजपने गोपीचंद पडळकर यांना उतरवले आहे. त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Visit : Policenama.com