ब्रेकिंग : राष्ट्रवादीचा प्रचार ‘शिवप्रेमी’ला ‘नडला’ ! कोंढव्यात तरुणावर खुनी हल्ला, डोक्यात 17 टाके तर हाथ मोडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. दरम्यान, जवळपास सर्वच मतदार संघात विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामध्येच पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा प्रचार केला म्हणून 20 ते 23 समाजकंटकांनी एका तरुण शिवप्रेमीवर खुनी हल्ला केला आहे. ही घटना आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सुमित बाबर (37, रा. कोंढवा खुर्द) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या ‘शिवप्रेमी’चे नाव आहे. सुमित बाबर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे यांचा प्रचार केला या कारणावरून समाजकंटांकडून त्यांच्यावर आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास खुनी हल्ला करण्यात आला. त्यामध्ये सुमित यांच्या डोक्यात 17 टाके पडले आहेत तर हाथ मोडला आहे. कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. दरम्यान, सुमित हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप मोठे अनुयायी आहेत.