राष्ट्रवादी देऊ शकते शिवसेनेला 50 – 50 चा प्रस्ताव, अगोदर केंद्रातील ‘अवजड’ ओझे खाली उतरवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने अगोदर भाजपाशी असलेली युती तोडावी, केंद्र सरकारमधील आपल्या मंत्र्याचा राजीनामा द्यायला सांगावे. त्यानंतर शिवसेनेला पाठिंबा देऊ असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला दिला जाऊ शकतो.

शिवसेना आणि भाजपा यांच्यातील संबंध दुरावले असल्याने राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. मात्र शिवसेनेने स्वत:हून पुढे येऊन अगोदर युती तोडावी. व ५० -५० टक्के फाॅर्मुला राबवावा, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची अपेक्षा आहे. त्यादृष्टीनेच आवश्यक त्या बाबी ठरविण्यासाठी आज संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेने अगोदर अवजड खात्याचा भार उतरवावा, त्यानंतर चर्चा करु असा प्रस्ताव असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. शरद पवार आज दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत हा प्रस्ताव जाहीर करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Visit : Policenama.com