उदयनराजें विरोधात राष्ट्रवादी देणार ‘तगडा’ उमेदवार, ‘ही’ 4 दिग्गज नावे चर्चेत

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले भाजपात सामील झाले  आहेत. साताऱ्यात उदयनराजेंची राजकीय कोंडी करण्यासाठी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने तगडा उमेदवार देण्याचे ठरवले आहे. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीतून 4 दिग्गजांची नावे चर्चेत आहेत.

उदयनराजे भोसले यांनी अमित शाह यांच्या उपस्थित दिल्लीमध्ये शनिवारी भाजपात प्रवेश केला. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडल्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकांच्या बरोबरच होणार असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत उदयनराजेंना घेरण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना तयार करण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे, राज्यपाल श्रीनिवास पाटील, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे यांचा आपल्या कोरेगाव मतदारसंघासह साताऱ्यातील इतर भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण –

सातारा लोकसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यास काँग्रेसला हा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार असल्याची चर्चा देखील सुरु होती.

उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. उदयनराजे राष्ट्रवादीमध्ये असताना, राष्ट्रवादीसाठी ही जागा एकतर्फी विजयाची होती.

visit : policenama.com