विधानसभा 2019 : मी आबांची लेक ‘ते’ नक्की माघार घेतील, अश्विनी कदम यांचा अर्ज दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पर्वती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी नाराजांची नाराजी दूर करण्यात येईल आणि नाराज उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन आघाडीला मदत करतील असा विश्वास व्यक्त केला.
Asvini Kadam

यावेळी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंकुश काकडे, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अभय छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस भगवान साळुंखे, शेतकरी कामगार पक्षाचे शहाराध्यक्ष सागर आल्हाट, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष महेश शिंदे, राष्ट्रवादीचे माजी आमदार कमलनानी ढोले-पाटील, राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रिया गदादे-पाटील, शिवाजीराव गदादे-पाटील, बाळासाहेब दाभेकर, दिलीप राऊत, नरेंद्र व्यवहारे, सुनिल बिबवे, संतोष नांगरे, विनायक हनमघर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.
Ashvini Kadam

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अश्विनी कदम म्हणाल्या, मला मतदारसंघाचा अनुभव असून मी स्थानिक आहे. त्यामुळे मला स्थानिक जनतेचे प्रश्न माहिती आहेत. मतदारसंघात विकास काम झेलेली नाहीत. येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसचे नाराज नगरसेवक आबा बागुल यांची मी लेकच आहे. ते मला पित्यासमान असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील. आबा नक्की माघार घेतील असे कदम म्हणाल्या.
Ashvini Kadam