राष्ट्रवादीच्या ‘या’ उमेदवाराकडून फोनवरून धमकी, ‘क्लिप’ व्हायरल !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेर मतदारसंघातील उमेदवार निलेश लंके यांनी पंचायत समिती सदस्याच्या भावाला फोनवरून धमकी दिल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आज झालेल्या व्हायरल क्लिपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.

डॉ. श्रीकांत तान्हाजी पठारे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, ‘मी पारनेर येथे वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. मी गेली अनेक वर्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असून गेली. अडीच वर्षापासून शिवसेना पक्षाचा पंचायत समिती सदस्य म्हणून काम करीत आहे. माझे बंधू डॉ. बाळासाहेब पठारे यांचा सुपा ता.पारनेर येथे वैद्यकीय व्यवसाय आहे. दि.१७/१०/२०१९ रोजी माझे बंधू डॉ. बाळासाहेब पठारे यांच्या मोबाईलवर (९८५०३९१७१७) रात्री ११.०० वाजण्याच्या सुमारास निलेश ज्ञानदेव लंके (रा.हंगा) यांनी त्यांचा मोबाईल नं. ९८२२५१५२५८ या नंबरवरून फोन केला. लंके यांनी माझ्या भावाजवळ मोबाईलरून बोलताना मला जीवे मारण्याची, आयुष्यातून संपवून टाकण्याची धमकी दिली. श्रीकांतला आयुषातून संपवून टाकील, माझ्याशी गाठ आहे. मी निवडून येणार आहे.

निवडून आल्यावर श्रीकांत पठारेला सोडणार नाही. कोणाशीही दोन हात मी करू शकतो, अशा प्रकारे मला जीवनातून संपवून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर माझ्या भावाने मला फोन करून त्या फोनबाबत माहिती दिली. त्यामुळे माझ्या कुटुंबात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. निलेश लंके यांच्याकडून अथवा त्यांच्या समर्थकांकडून माझ्यासह माझे बंधू, कुटुंबीय यांना धोका निर्माण झाला आहे. आमचे काही बरे वाईट झाले तर त्यास सर्वस्वी निलेश लंके व त्याचे समर्थक जबाबदार असतील, असे अर्जात म्हटले आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या