बीडमध्ये महिला बोगस मतदारास राष्ट्रवादीनं रेडहॅन्ड पकडलं, जयदत्त क्षीरसागरांच्या कॉलेजवर कामाला असल्याचं सांगितलं (व्हिडिओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेसाठी राज्यात आज मतदान होत आहे. मात्र, बीड शहरातील एका मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी बोगस मतदानाचा आरोप करत गोंधळ घातलाअसं सांगितलं जातयं पण वस्तुस्थिती वेगळीच समोर आली आहे. बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या महिलेला रेडहॅन्ड पकडल्यावर तिनं सर्व सत्यचं सांगितलं आहे. बीडमध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण झाले.

शहराती बालेपीर मधील इंदिरा माध्यमिक विद्यालयात असलेल्या मतदान केंद्रामध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. तसेच बोगस मतदान होत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. मतदरांचे नाव मतदार यादीमध्ये आहे. त्यामुळे हा गोंधळ नेमका कशामुळे झाला हे प्रशासनाकडून सांगण्यात आले नाही.

संदीप क्षीरसागर यांनी केलेले आरोप पाटोदा मतदारसंघामधून बीड मतदारसंघामध्ये मतदानासाठी बोगस मतदार आणल्याचा दावा केला आहे. शिक्षण संस्थेवरील कर्मचारी यांच्यासह 20 लोकांची यादी दाखवत आहेत. मतदार यादीत नाव असेल तर मतदानापासून रोखू नये असे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले.

Visit  :Policenama.com

You might also like