पुणे-पिंपरी मध्ये या 7 जागा राष्ट्रवादी लढवणार : अजित पवार यांची घोषणा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी, चिंचवडसह भोसरी या 3 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. आघाडीत या जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर केले आज जाहीर केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने काळेवाडी येथे आयोजित जाहिर मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस अमोल मितकरी, शेख सुबानअली महंमद, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पूर्वी अजित पवार यांनी पुण्यातील खडकवासला, पर्वती, हडपसर आणि वडगावशेरी या मतदार संघातून राष्ट्रवादी लढणार असल्याचे सांगितले होते.

Visit :- policenama.com

You might also like