पुणे शहरातील ‘हे’ 4 विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे : अजित पवारांची घोषणा

पुण्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे जागा वाटप निश्‍चित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक आयोगाने काल (शनिवारी) राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहिर केल्या. त्यानंतर सर्वच पक्षांनी निवडणूकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आज शरद पवार सातार्‍यात तर अजित पवार पुण्यात आहेत. पुण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार यांनी पुणे शहरातील 4 विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे असतील अशी थेट घोषणा केली आहे.

पर्वती, हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता कोथरूड, शिवाजीनगर , कॅन्टोमेंट आणि कसबा विधानसभा मतदार संघातून काँग्रेस किंवा मित्र पक्षाचे उमेदवार निवडणूक लढतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे. पुण्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. निवडणूकीची तयारी नेमकी कशी करावी, कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदाराला नेमकं काय सांगावं याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते आणि पदाधिकारी मेळाव्यास उपस्थित होते.

Visit :- policenama.com

You might also like