परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पाथरी येथे महिला सुरक्षा जागृती

परभणी : पोलिसनामा ऑनलाइन – सोमवारी, 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाथरी येथे महिला सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पाथरी येथील शांताबाई नखाते विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते यांची उपस्थिती होती. नायब तहसीलदार वसुधा बागुल, रेखाताई मानेरे, अ‍ॅड. निलेश गोरे, कुमारी रुजुता शिंदे, प्रयाग वामन आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा भावना नखाते म्हणाल्या की, महिलांनी वेगवान युगात आत्मरक्षाचे ज्ञान अंगीकारले पाहिजे. कौटुंबिक जबाबदार्‍या असलेल्या बर्‍याच स्त्रियांनी प्रशासकीय जबाबदार्‍या योग्यप्रकारे हाताळताना चांगले काम केले. ज्ञान आणि आत्मविश्वासाने आत्मनिर्भर बनले पाहिजे असे मत यावेळी बोलताना भावना नखाते यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांनी ही आपले मत व्यक्त केले. पाथरीचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले.