बाळासाहेबांच्या ‘स्वप्नपूर्ती’साठी मिळून प्रयत्न करू : छगन भुजबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिवसातून एकदा तरी बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा करुया’ असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन असून, शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की , ‘बाळासाहेबांसोबत मी 25 वर्षे कार्यरत होतो. शिवसेनेचे चढ-उतार, लढाई होत्या त्यामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी होत होतो. त्या सर्वाचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे, दिवसातून एकदा तरी बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा करुया. शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी सगळे जण मिळून बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. ‘

निवडणुकांचे निकाल लागल्यापासून शिवसेना व राष्ट्रवादीचे जवळकीचे संबंध निर्माण झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्रीपदावरून भाजप व शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरु आहेत.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like