‘मध्यावधी’ निवडणूकीबाबत शरद पवारांचं मोठं ‘विधान’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रपती राजवट लागू असली तरी काळजी करायची गरज नाही. राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, चिंता नको. नव्या आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राजाच्या सध्याच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची वाय. बी. चव्हाण सभागृहात आज सकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीत पवार यांनी मध्यावधी निवडणुका होणार नाही सांगत सत्ता स्थापनेबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. बैठकीत शरद पवार म्हणले की , ‘राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत. त्यामुळे भीती बाळगू नका, आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांना भेटा, त्यांचे आभार माना. आमदारांनी आता आपल्या मतदारसंघात जाऊन कामाला सुरुवात करावी. अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे, त्याबाबत त्यांना दिलासा देण्याचं काम करावं. आपण ज्या मतदारसंघात निवडणूक जिंकली आहे तिथं जाऊन नेत्यांनी आभार दौरे करावेत.’

या बैठकीत समान कार्यक्रम ठरविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 जणांची समिती तयार करण्यात आली आहे. तसेच आमदारांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख नेत्यांवर देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like