Video : मुंबईत खा. सुप्रिया सुळेंसोबत शरद पवारांची “सफर’, जुन्या आठवणींना उजाळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना नुकत्याच काही दिवसापूर्वी रुग्णालयातून डिचार्जे मिळाला. शरद पवार यांच्यावर पित्ताशयावरील शस्त्रक्रिया सुरु होती. घरी आल्यानंतर पवारांना थोडे बरे वाटण्यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना घेऊन सहजच कारमधून मुंबई शहरात फिरण्यास गेल्या त्याक्षणी खा. सुप्रिया सुळेंनी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पवार यांच्याशीच संवाद साधला आहे.

घरातून फिरण्यास बाहेर पडल्यावर त्यांनी आताची मुंबई आणि अगोदरची मुंबई याविषयी चर्चा केल्या गेल्या. सुप्रिया सुळे यांनी पवार यांच्याशी सवांद साधताना अनेक प्रश्न विचारले आणि जाणून घेतले कि मुंबईची कहाणी पूर्वीची आणि आताची. तसेच, पूर्वीची मुंबई कशी होती, काळानुसार काय बदलत होते गेले, ते मुंबईत कधी आले? कुठे राहिले?, अशा सर्व जुन्या आठवणी उलगडत काढत शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे चर्चा केली आहे.

पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामधील सवांद –

सुप्रिया सुळे म्हणतात, – नमस्कार रितसर परवानगी घेऊन बाहेर पडलो आहे. लॉकडाऊन आहे याची जाणीव आहे, जबाबदारी आहे.. मी आणि बाबा चेंज म्हणून ड्राईव्हला आलो आहे, मुंबईत..तर मुंबई किती बदलली आहे आपण आलो तेव्हाची आणि आताची, आपण १९७१ मध्ये आलो ना. मी आणि आई ऑफिशिअली आलो आहे.

शरद पवार म्हणतात, – मी साधारणत: ६२ ते ६३ मध्ये काँग्रेसचे युवक सेक्रेटरी म्हणून आलो, तेव्हा दादरला खेड गल्ली होती. तिथे सर्वजण मिल वर्कर होते. पुणे जिल्ह्यातील लोक अधिक होते. आता त्याचं नाव काकासाहेब गाडगीळ लेन असे आहे. सध्या तिथे काँग्रेसचं टिळक भवन आहे. तिथे आम्ही राहायचो, आम्ही तिथे ५ वर्ष टिळक भवनमध्ये राहिलो. मी आणि काँग्रेस नेते असे बरेच होतो, सध्या बदललं आहे सर्व. तसेच, त्यावेळी मुंबईत तो भाग जो आहे, तो सामान्य लोकांचा होता. तिथे कोकणातील होते, घाटावरचे होते. कोकणी लोक मोठ्या संख्येने होते. सर्व कष्टकऱ्यांचा, कामगारांचा होता.. लालबाग, परळ आदी होते.

पुढे पवार सवांद साधत म्हणतात, एकत्र येऊन सण साजरे करणे.. जसे कोकणात वेगवेगळे सण आहेत, ते साजरे करायचे. तेव्हा घाटावरचे लोक म्हणायचे. आपण सर्व घाटी होतो.. आपल्याला घाटी म्हणायचे..आपल्याकडे काही लोक इकडे असायचे. मग गावाकडून कोणी कार्यकर्ता, पाहुणा आला की भागातील लोक सर्व जाऊन त्याला चांगलं जेवण वगैरे देणार, त्याला सिनेमा दाखवणार, तो माणूस गावाकडे जाऊन सांगायचा, काय माझी बडदास्त ठेवलेय, सिनेमा दाखवला, जेवण दिलं आदी, ते लोक खुश होऊन जायचे., की, गावाकडे सांगायचे आपले लोक कसे चांगले वागतात असे काही.

तसेच पवार आणखी म्हणतात की, ती वेगळी मुंबई होती, आताची वेगळी आहे. ते कल्चर वेगळं होतं.. मुख्य म्हणजे इथला सामान्य माणूस गेला., मराठी माणूस. आता बहुमजली इमारती आल्या., समाजकारण देखील बदललं आहे. अशा थोडक्यात गप्पा शरद पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांच्यामध्ये कारमधूनच फेरफटका मारता फेसबुकच्या माध्यमातून झाल्या.