भर सभेत कुत्रा घुसला अन् शरद पवार म्हणाले, शिवसेनेची लोकं आली का ? (व्हिडिओ)

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – उस्मानाबाद येथे सभेत कुत्रा घुसला यावरून शिवसेनेची लोकं आले काय की अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी मराठवाड्यातून आपल्या प्रचार दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उस्मानाबादेत सभा पार पडली. शरद पवार जेव्हा सभेला संबोधित करत होते. तेव्हा सभेच्या ठिकाणी कुठून तरी कुत्रा आला. त्यावेळी पवार यांनी लगेच कुत्र्याकडे हात करत ‘शिवसेनेची लोकं आले काय की’ असा उपरोधिक टोला लगावला आणि सभा मंडपात एकच हश्शा पिकला. पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून जोरदार चर्चा होत आहे.

शरद पवार यांनी मराठवाड्यातून आपल्या प्रचार दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात केलीअसून मंगळवारी दुपारी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे जाहीर सभा घेऊन उपस्थितांशी संवाद साधला. गुरुवार 3 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता मुंब्रा, ठाणे येथे शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. तर शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी बिद्री, राधानगरी, कोल्हापूर येथे जाहीर सभा होणार आहेत.

Visit : Policenama.com