NCP Chief Sharad Pawar | धनुष्यबाण चिन्हाबाबत शरद पवारांचा शिंदेंना महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shiv Sena) आणि एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Group) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु असलेल्या कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत भाष्य केलं. त्यांनी एकनाथ शिंदे यांना एक सल्ला दिला आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह (Dhanushya Ban Symbol) आहे. एखाद्या पक्षाचं चिन्ह काढून घेणं योग्य नाही, असे म्हणत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढावा असा सल्ला शरद पवार यांनी दिला. जेव्हा मी काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला, वेगळं चिन्ह घेतलं. मी काँग्रेस पक्षाचं चिन्ह मागितलं नाही. त्याच्यातून वादविवाद वाढवणे योग्य नाही, असेही शरद पवारांनी (NCP Chief Sharad Pawar) सांगितले.

 

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांनी प्रत्युत्तर दिले.
शरद पवार यांनी पक्ष बदलला तेव्हा कायदेच नव्हते. डिफेक्शनचे कायदे (Law of Defection) कुठे होते तेव्हा,
कोणालाही कसेही पक्ष बदलता येत होते.
आज कायदे तयार झालेले आहेत. त्यामुळे कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे, ती एकनाथ शिंदे आणि शिवसेना करत आहे,
असे म्हणत शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरु असलेल्या पक्षातील चिन्हाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली.

 

खातेवाटपाआधी फडणवीसांची गुगली

मंत्र्यांचं खातेवाटप कधी होणार असं माध्यमांच्या प्रतिनिधींनी फडणवीस यांना विचारलं असता ते तर तुम्हीच करुन टाकलंय अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
माध्यमांनीच खातेवाटप करुन टाकले आहे. आमच्या करता खातेवाटप शिल्लकच ठेवलेलं नाही.
पुण तुम्ही जे खातेवाटप केलं ते सपशेल चुकीचं ठरेल एवढे मी नक्की सांगतो असं सांगत तुमचे अंदाज पूर्णपणे चुकणार असल्याचा दावा त्यांनी केला.

 

 

Web Title : –  NCP Chief Sharad Pawar | bow and arrow is shivsena party symbol eknath shinde should choose new party symbol says ncp chief sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा