औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाने मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती देताना उस्मानाबादपुढे धाराशिव शब्द वापरला. शिवसेनेकडून नामांतराचा मुद्दा रेटला जात असताना कॉंग्रेसकडून त्याला विरोध होत आहे. असे असताना राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर अगदी मोजक्या शब्दात यावर भाष्य केले आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. या विषयाकडे मी गांभीर्यान पाहत नाही, असे पवार म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कार्यालयाकडून कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना औरंगाबादसाठी संभाजीनगर, तर उस्मानाबादसाठी धाराशिव असा उल्लेख केला जात आहे. याला काँग्रेसनं आक्षेप घेतला असला तरीही मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून तेच शब्द वापरले जात आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध काँग्रेस सामना पाहायला मिळाला. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी अगदी मोजक्या भाषेत भाष्यं करत आपली भूमिका मांडली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्याने सीएमओच्या ट्विटर हँडलवर संभाजीनगर शब्द वापरला गेला. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्विट करत माहिती व जनसंपर्क विभागाला बजावले होते. मात्र त्यानंतरही CMO च्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विधानात संभाजीनगर म्हटल्याने सीएमओनं तोच शब्द ट्विटमध्ये वापरला होता.