NCP Chief Sharad Pawar | …तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले, शरद पवारांनी सांगितला सुशिलकुमार शिंदे यांच्याशी निगडीत किस्सा (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी मी सांगितल्यावरुन पोलीस खात्यातील (Police Department) नोकरी सोडली. मी त्यांना पोटनिवडणुकीत (By-Election) आमदारकीचे तिकीट मिळवून देतो असे आश्वासन दिले होते. पण तिकीट मिळवून देऊ शकलो नाही तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सांगितले. पुणे नवरात्र महोत्सवात (Pune Navratri Festival) दरवर्षी दिला जाणारा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी बोलताना शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी हा किस्सा सांगितला.

तर शरद पवार काय आहेत, हे देशाला कळल नसतं

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर अनेकदा टीका करताना विरोधकांकडून 1978 मधील खंजीर प्रकरणाचा उल्लेख केला जातो. मात्र सुशिलकुमार शिंदे यांनी या प्रकरणावर कौतुकोद्गार काढले. शरद पवार यांनी 1978 ला वसंतदादा (Vasantdada Patil) यांचं सरकार पाडून स्वत:च सरकार बनवलं नसते तर शरद पवार ही काय चीज आहे हे देशाला समजले नसते, असे शिंदे म्हणाले.

पुण्यात जेवढे पुरस्कार दिले जातात तेवढे…

पुरस्कार सोहळ्यात भाषण करताना शरद पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली. पुण्यात जेवढे पुरस्कार दिले जातात तेवढे देशातील कुठल्याच शहरात दिले जात नसल्याचे पवार म्हणाले. पुरस्कार देणे, पुरस्कार ठरवणारे आणि पुरस्कार स्वीकारणारे ही ठराविक मंडळी असल्याचे ते म्हणाले. यामध्ये रघुनाथ माशेलकर (Raghunath Maselkar), प्रतापराव पवार (Prataprao Pawar) ही नावे पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तिंच्या यादीत असतात. तर उल्हास पवार (Ulhas Pawar), अंकुश काकडे (Ankush Kakade), शांतिलाल सुरतवाला (Shantilal Suratwala) हे पुरस्कार ठरवणारे लोक असतात, असे शरद पवार म्हणाले.

तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी आले

शरद पवार यांनी यावेळी सुशिलकुमार यांच्याशी निगडीत एक किस्सा सांगितला.
सुशीलकुमार शिंदे यांनी मी सांगितल्यावरुन पोलीस खात्यातील नोकरी सोडली.
मी त्यांना पोटनिवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळवून देतो असे आश्वासन दिले होते.
पण तिकीट मिळवून देऊ शकलो नाही तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आल्याचे शरद पवारांनी सांगितले.
त्या सरकारमध्ये मी गृहमंत्री झालो होतो. शिंदे कायद्याचे पदवीधर असल्याने मी त्यांना सरकारी वकील
(Public Prosecutor) म्हणून जबाबदारी दिली होती. काही प्रकरणे त्यांना देण्याचे ठरवले होते.
मात्र, त्या पुढील निवडणुकीत सुशिलकुमार शिंदे यांना निवडणुकीचे तिकीट मिळवून देण्यात मी यशस्वी झालो.
त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी सुशिलकुमार शिंदे यांचे कौतुक केले.

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | congress leader sushilkumar shinde praise sharad pawar for formation of government in 1978 maharashtra politics news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shambhuraj Desai | गोव्यातून दारुची एक बाटली आणली तरी…, शिंदे सरकारचा आदेश, राज्यातील मद्यविक्रेत्यांना दिलासा, महसुलही वाढणार

Andheri East by Election | शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाची पहिली परीक्षा, अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Girish Mahajan | एकनाथ खडसेंच्या BJP प्रवेशाबाबत मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा; म्हणाले – मी, फडणवीस, खडसे एकत्र…