NCP Chief Sharad Pawar | कर्नाटक निकालाबाबत शरद पवारांचं महत्त्वाचे निरीक्षण, पक्षातील नेत्यांना सांगितला पुढचा धोका!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यासह पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालाबाबत (Karnataka Election Results) महत्त्वाचे निरिक्षण नोंदवलं. काँग्रेस (Congress) पक्ष सोडून भाजपमध्ये (BJP) गेलेल्या आमदारांना पराभवाला सामोरं जावं लागलं, असं पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी नेत्यांना सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न फसला

भाजपने कर्नाटकमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला म्हणून जनतेने त्यांना नाकारले. आमदार फुटून जाऊन भाजपला मदत करतील अशी स्थिती ठेवली नाही, त्यामुळे स्पष्ट बहुमत काँग्रेस पक्षाला मिळाले. यातून मतदारांचा कौल दिसून येतो, असं शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सांगितले.

पवारांचा नेत्यांना धोक्याचा इशारा

मागील काही काळापासून राष्ट्रवादीचे आमदार पक्षात अस्वस्थ असून भाजपसोबत जाऊ शकतात,
अशी चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे पक्ष सोडून जाण्याचा विचार करणाऱ्या नेत्यांना शरद पवार यांनी
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील परिस्थितीचा अंदाज देत धोक्याचा इशारा दिला आहे. काँग्रेस सोडून भाजपसोबत
गेल्याने किंवा भाजपला मदत करुन शरणाऱ्यांना जनतेने नाकारले आहे, असं विश्लेषण शरद पवारांनी आज
झालेल्या बैठकीत केलं.

Web Title : NCP Chief Sharad Pawar | karnataka elections people opposes leaders who went to bjp from congress says sharad pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole on Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांच्या आरोपांना नाना पटोलेंचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘गैरसमज निर्माण केला जात असेल तर…’

Lok Sabha Election 2024 | राष्ट्रवादीचं मिशन लोकसभा, विभागवार नेत्यांना दिली जबाबदारी; पुणे विभागाची जबाबदारी ‘या’ तरुण नेत्यावर

MLA Sanjay Shirsat | राज्यातील हिंसाचारामागे उद्धव ठाकरेंचा हात आहे का?, एसआयटी मार्फत चौकशी करण्याची शिरसाट यांची मागणी