NCP Chief Sharad Pawar | कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी होतील याची मला खात्री नव्हती – शरद पवार (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा विधानसभा मतदारसंघाचे (Kasba Assembly Constituency) नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतली. धंगेकर यांनी 28 वर्षांनी हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव करुन भाजपच्या (BJP) ताब्यातून कसब्याचा गड हिसकावला. पण कसब्यात धंगेकर विजयी होतील याची मला खात्री नव्हती असे शरद पवार यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कसब्यात महाविकास आघाडीची एकजूट दिसली. भाजपचा कसबा गड ढासळला. भाजपने कसब्यात बापट, टिळकांना डावलून निर्णय घेतले, असंही शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सांगितले. तसेच जनतेला बदल हवा होता, बदलासाठी सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.

कसब्यात यश मिळेल याची खात्री नव्हती

कसब्यात यश मिळे असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं. मात्र मला त्याची खात्री नव्हती. नारायण पेठ (Narayan Peth) आणि शनिवार पेठ (Shaniwar Peth) हा भाजपचा गड आहे. त्यामुळे कसब्यात विजय होईल की नाही याची खात्री नव्हती. कसब्यात गिरीश बापट (Girish Bapat) यांनी अनेक वर्ष प्रतिनिधीत्व केलं होतं. ते लोकांमध्ये असायचे, त्यांचे भाजप आणि त्यांच्या परिवाराशी घनिष्ठ संबंध होते. पण भाजपशी संबंध नसलेल्यांशीही त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळेच त्यांच लक्ष असलेल्या मतदारसंघात जड जाईल असं वाटत होतं. पण उत्तम उमेदवार, उमेदवाराचं काम, पक्षाचा पाठिंबा आणि मविआतील सर्व घटकांचे मनापासून लढणे, या सर्व गोष्टी जुळून आल्याने आम्हाला यश आल्याचे शरद पवारांनी (NCP Chief Sharad Pawar) सांगितले.

त्यांनी हे तर मान्य केलं

महाराष्ट्रात लोकांना बदल पाहिजे. त्यासाठी लोकांनी एकत्र यायला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) धंगेकरांचा विजय हा वैयक्तिक होता, असं म्हटलं. हरकत नाही. या उमेदवाराला तिकीट देण्यात आमचं व्हिजन होतं, हे तर त्यांनी मान्य केलं. कारण निवडणुकीच्या आधी त्यांची वक्तव्य काय काय होती, हे भाषणात आलं आहे. आता त्यात थोडासा गुणात्मक बदल आहे. किमान निवडून आलेल्या व्यक्तीबद्दल ते चांगलं बोलतायत. चांगली गोष्ट आहे. धंगेकरांनी मागील तीस वर्षे जे काम केलं त्याला लोकांनी मतं दिल्याचे शरद पवारांनी सांगितले.

त्या पत्रावर पहिली सही माझी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्यां नऊ नेत्यांनी पत्र लिहिलं आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, पंतप्रधानांना नऊ विरोधी पक्षांनी जे पत्र लिहिले आहे त्या पत्रावर पहिली सही माझी आहे. केजरीवाल यांच्या सरकारनं (Kejriwal Government) शाळांसाठी जे काम केलंय ते पाहण्यासाठी बाहेरून लोक येतात. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी परदेशात जाऊन वस्तुस्थिती सांगितली. त्यात चुकीचं काय. विरोधकांची एकजूट काँग्रेसला (Congress) सोबत घेऊनच झाली पाहिजे. काँग्रस हा देशातील महत्त्वाचा पक्ष असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

शहाण्या माणसाबद्दल विचारा

पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर बोलताना शहाण्या माणसाबद्दल विचारा असा टोला लगावला.
तसेच, काल झालेल्या उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) खेड येथील सभेत राष्ट्रवादीचे लोक होते,
असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, सभेत जर राष्ट्रवादीचे लोक असतील तर आनंदच आहे.
कारण आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकच भूमिका मांडत आहेत आणि या तीन पक्षांची ताकद
कालच्या उद्धव ठाकरेंच्या सभेत दिसून आली.

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | maharashtra politics ncp chief sharad pawar on pune kasaba bypoll congress ravindra dhangekar victory

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीच्या नाकाचे हाड केले फ्रॅक्चर; कोंढव्यातील घटना

V V Karmarkar Passes Away | मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक वि. वि. करमरकर यांचे निधन

Pune Crime News | आईनेच चिमुरडीचा गळा दाबून केला खून; खडकीतील ३ वर्षाच्या मुलीच्या खूनाचा गुन्हा उघडकीस