NCP Chief Sharad Pawar | राऊतांना धमकी देणारे दोघे ताब्यात, तर शरद पवारांना धमकी देणाऱ्यांवर FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना सोशल मीडियावरुन धमकी देण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि संजय राऊत या दोन बड्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

 

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना ‘राजकारण महाराष्ट्राचं’ या नावाच्या ग्रुपवरुन ‘तुमचा दाभोळकर करु’ अशा आशयाची जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त (Mumbai CP) विवेक फणसाळकर (IPS Vivek Phansalkar) यांची भेट घेऊन याबाबत तक्रार दिली. शरद पवार यांना धमकी आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. पवार यांना धमकी देणारा भाजपशी (BJP) संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.

 

पवारांच्या धमकी प्रकरणी दोघांवर FIR

शरद पवार यांना धमकी दिल्या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. राष्टवादी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार नर्मदाबाई पटवर्धन (Narmadabai Patwardhan) आणि सौरभ पिंपळकर (Saurabh Pimpalkar) यांच्यावर आयपीसी 153 A, 504, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) करीत आहे.

 

राऊतांना धमकी देणारे ताब्यात

खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांना फोनवरुन धमकी दिल्या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
राऊत यांना फोन करुन गोळ्या घालण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात अद्याप राऊतांकडून तक्रार आली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
पोलिसांकडून गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई केली जाणार आहे.
ताब्यात घेतलेले दोघेजण गोवंडी मधील असून नशेच्या धुंदीत त्यांनी ही धमकी दिली, अशी प्राथमिक माहिती आहे.

 

 

Web Title :  NCP Chief Sharad Pawar | mumbai police filed case against who threaten to
ncp chief sharad pawar while 2 detain in raut threaten case

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा