NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांकडून शिवसेनेचं कौतुक, म्हणाले – ‘शिवसेना विश्वास असणार पक्ष, बाळासाहेबांनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Nationalist Congress Party)10 जून रोजी 22 वा वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित केला होता. वर्धापनाच्या आयोजित कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे बोलत होते.

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Nationalist Congress Party)10 जून रोजी 22 वा वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित केला होता. वर्धापनाच्या आयोजित कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे बोलत होते. शरद पवार यांनी कार्यक्रमावेळी सवांद साधताना शिवसेनेचं तोंडभरून कौतुक केलं आहे. शिवसेना (Shiv Sena) हा विश्वासाचा पक्ष आहे, म्हणत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb Thackeray) यांची आठवण देखील काढली आहे. तसेच, आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं आहे. ‘हे सरकार आगामी 5 वर्षे टिकेल आणि कामही करेल. हे सरकार नुसतं काम करणार नाही, तर लोकसभा आणि विधानसभेत (Lok Sabha and Vidhan) Sabha एकत्रिक काम करून सर्वसामान्य जनतेचं देशात आणि राज्याचं प्रतिनिधीत्वही करेल यात शंका नाही, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, शिवसेनेबरोबर (Shiv Sena) आपण कधी काम केलं नाही.
मात्र, महाराष्ट्रात शिवसेनेला अनेक वर्षांपासून बघत आहे.
माझा याबाबतचा अनुभव विश्वास असणाराच आहे.
ज्यावेळी जनता पक्षाचे राज्य आले. आणि काँग्रेस (Congress) पक्षाचा पराभव झाला,
त्याचवेळी काँग्रेस पक्षाला साथ देण्यासाठी शिवसेना हाच पक्ष समोर आला.
त्यांनी इंदिरा गांधी यांना सहकार्य करण्यासाठी विधानसभा निवडणुकीमध्ये एकही उमेदवार लढवण्यास थांबवला नाही.
पक्षाचा नेता असा निर्णय घेतो याचा तुन्ही विचार करा.
परंतु, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याची कधीही काळजी केली नाही.
बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांना दिलेला शब्द त्यावेळी निवडणुकांना लक्षात न घेता पाळला गेला.

पुढे शरद पवार म्हणाले, कोणीही काही शंका घेतली तरी शिवसेनेनं ज्या पद्धतीनं कालखंडात भक्कम पणाची भूमिका घेतलीय ती भूमिका सोडण्याबाबत कोणी सांगत असेल तरी तसं होणार नाही.
असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) स्थापन होऊन बावीस वर्ष झालीत.

राजकारणात सातत्याने कार्य करत राहणे आवश्यक असतं.
सत्ता महत्त्वाची आहेच, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता आवश्यक आहे.
लोकांसाठी कामही करणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
तसेच, सत्ता अधिक हातात गेली पाहिजे.

ती एकाच ठिकाणी राही तर भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिक लोकांच्या हाती जाणं गरजेचे आहे. हे मान्य असेल तर समाजातील प्रत्येक घटकाला आपण सत्तेचे वाटेकरी आहोत असं वाटलं पाहिजे.
OBC असो अथवा मराठा आरक्षण हे प्रश्न सोडवावेच लागतील.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर अनेक शंका उपस्थित झाल्या.
परंतु, त्या योग्य नसल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हे देखील वाचा

आमची वाघाशी दुश्मनी कधीच नव्हती, दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान (व्हिडीओ)

Nashik Election | नाशिकचा पुढील महापौर शिवसेनेचा, मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 16,379 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 95.45% 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा