NCP Chief Sharad Pawar | हाताला पट्टी अन् कातर झालेला आवाज, शरद पवारांनी ‘मंथन शिबिरा’ला लावली हजेरी (व्हिडिओ)

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – हाताला लावलेल्या पट्ट्या अन् कातर झालेला आवाज… अशा परिस्थिती राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शिर्डीच्या शिबिराला उपस्थिती लावली. खुर्चीवर बसून त्यांनी आपलं लहान मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या भाषणाचा कागद माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांच्या हाती सोपवून आपलंच भाषण वळसे-पाटील यांच्या तोंडून ऐकलं. आजारपणात देखील शरद पवार यांनी शिबिराला उपस्थिती लावून छोटेखानी भाषण केल्यामुळे उपस्थित कार्यकर्ते आचंबित झाले. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) मंचावर येत असताना उपस्थित कार्यकर्त्यांनी उभे राहून त्यांचे स्वागत कले तसेच बोलण्यासाठी त्यांनी माईक हातात घेतात टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना मानवंदना दिली.

यावेळी भाषणात शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, मी सगळ्यांची भाषणं ऐकली नाहीत, पण काही भाषणं ऐकण्याची संधी मिळाली. सध्या मी एवढंच सागू इच्छितो की, आज मला सविस्तर बोलणं शक्य नाही. कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (Medical Officers) तसा सल्ला दिला आहे. आणखी 10 ते 15 दिवसांनी मला नेहमीचं काम करता येईल, असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पण या शिबिरातून एक संदेश जात आहे की, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने हा पक्ष मजबूत करणार आहे. महाराष्ट्र परिवर्तन घडवण्याची ताकद आणि हिंमत तुमच्यमध्ये आहे, ही संधी लवकरच मिळेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

एवढं बोलून शरद पवार यांनी काही मिनिटांत आपलं भाषण आटोपतं घेतलं.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांचे उर्वरित भाषण वाचून दाखवलं. प्रकृती ठीक नसतानाही शरद पवार यांनी शिबिराला हजेरी लावली. पण यावेळी अजित पवार (Ajit Pawar) मात्र दिसले नाहीत.

दरम्यान, तब्येत बरी नसतानाही पवार साहेब आपण ‘राष्ट्रवादी मंथन शिबिरा’ला उपस्थित राहून आम्हा कार्य़कर्त्यांना
मार्गदर्शन केलंत… आज तुमच्या हाताला इंजेक्शनची पट्टी होती… अशाही स्थितीत लढणारा तुमच्यातील योद्धा
उद्या लोकशाहीवरील संकटाला परतवून लावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आहे,
असं ट्विट आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी केलं.

Web Title :-  NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar at shirdi live speech dilip walase patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Calum MacLeod | कॅलम मॅक्लिओडची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Priyanka Chopra | ‘मिस वर्ल्ड 2000’ची स्पर्धा होती ‘फिक्स’? प्रियांका चोप्राच्या विजयावर अनेक प्रश्न उपस्थित

Rajkummar Rao | अभिनेता राजकुमार राव याने मनातील ‘ते’ दु:ख अखेर बोलून दाखवले; म्हणाला कि….