NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांनी गृहखात्याला झापलं? म्हणाले – ‘एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते (Shiv Sena Leader) आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) तिन्ही पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे दिल्ली नियोजित बैठकीसाठी गेले होते. तेथून काल रात्री मुंबईत आल्यानंतर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी आज (बुधवार) सकाळी त्यांच्या सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानी प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी गृहखात्यावर (Home Department) संताप व्यक्त केला.

 

राज्यातील शिवसेनेच्या आमदारांचे बंड आता आणखी तिव्र होताना पहायला मिळत आहे. कारण मंत्री एकनाथ शिंदे हे सर्व बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकार विरोधात बंडाचे निशाण फडकवणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. ‘माझ्यासोबत केवळ 35 नाही तर 40 शिवसेना आमदारांचा (MLA) पाठिंबा आहे. याशिवाय आणखी 10 आमदार सोबत येणार आहेत’, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

 

आज सकाळी शरद पवार यांची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) आणि मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासोबत त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली. एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित करत गृहखात्यावर नाराजी व्यक्त केली.

 

दरम्यान, गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलमध्ये (Radisson Hotel Guwahati) एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे व पाठिंबा देणारे अपक्ष आमदार (Independent MLA) आहेत.
ही संख्या 40 असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. तसेच गटनेते पदाचा दावा करण्यासाठी शिंदे गोव्याला जाण्याची शक्यता होती.
गेल्या अर्धा तासापासून या आमदारांची बैठक सुरु आहे. या बैठकीत गटनेता ठरविला जाणार आहे.
तसेच त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी शिंदे स्वत: राज्यपालांना भेटण्यास जाण्याची शक्यता आहे.
याचवेळी भाजपचे (BJP) आमदारही संख्याबळ दाखवून सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

सर्व आमदार स्वखुशीनं इथं आहेत – बच्चू कडू
आमदारांना मारहाण करुन डांबून ठेवण्यात आलाचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी केला होता.
याबाबत विचारलं असता राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी इथं असं अजिबात काहीच झालेलं नाही असं सांगितलं.
सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत.
सगळ्या आमदारांची आज मीटिंग होईल आणि संध्याकाळपर्यंत काय ते सर्व समजेल.
या सर्व प्रकाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि शिवसेनेचे आणखी आमदार स्वत:हून इथं येण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच या आमदारांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar cirtcism on home department said how come you dont know that so many ministers left overnight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल…’ – संजय राऊत

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

 

Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण