NCP Chief Sharad Pawar | राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी केली ‘ही’ मागणी, म्हणाले-‘जर संविधानाच्या विरोधात…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी देखील कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, माझ्या मते महाराष्ट्राची (Maharashtra Governor) सुटका झाली. अतिशय चांगला निर्णय. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती कधीही राज्यपाल म्हणून झाली होती, ती आपण पाहिली. केंद्र सरकार (Central Government) आणि राष्ट्रपतींनी (President) त्यात बदल केला, ही समाधानकारक बाब आहे, असल्याचे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले.

 

राज्यपालांनी संविधान (Constitution) विरोधी जे निर्णय घेतले होते, त्याचे काय होणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, जर संविधानाच्या विरोधात काही झाले असेल तर त्याची चौकशी (Inquiry) झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शरद पवार यांनी याआधी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्या नंतर त्यांच्यावर टिका झाली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी परत जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यावेळी देखील शरद पवार यांनी त्यांना टोला लगावला होता. ते राज्यपाल पदावर दु:खी असतील, तर आम्हीही सगळे दु:खीच आहोत. महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या राज्यात लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले. पी.सी. अलेक्झांडर (P.C. Alexander) यांच्यासारखे अनेकांची नावे यामध्ये घेता येतील.
हे पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल सतत चर्चा होते.
त्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लगते, अशी टीका शरद पवार यांनी केली होती.

 

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar comment on bhagat singh koshyari resignation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा