NCP Chief Sharad Pawar | विरोधात लिहित होते म्हणून संजय राऊतांना अटक झाली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु असलेली सुनावणी, सुरु असलेले विधिमंडळाचे अधिवेशन (Legislative Session), त्यात विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या ठिकाणी सत्ता नव्हती तिथे सत्ता आणली. भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप करत अनिल देशमुख (Anil Deshmukh), नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यानंतर संजय राऊतांवर (Sanjay Raut) ईडीने (ED) कारवाई केली. या कारवाईवर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी संताप व्यक्त केला.

 

म्हणून राऊतांवर कारवाई
महाराष्ट्रात भाजपची हुकुमत नव्हती, पण शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) गेल्याने भाजपची हुकुमत आल्याची खोचक टीका शरद पवार यांनी केली. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) दिल्लीत प्रसारमाध्यांशी बोलत होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाली. ते विरोधात लिहित होते, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. अशा पद्धतीने देशात कारवाया केल्या जात आहेत. देशात सत्तेचा गैरप्रकार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाते
आज हुकूमत त्यांच्या हातात आहे. जो राजकीय पक्ष किंवा नेता त्यांच्या विरोधात बोलतो त्याच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे.
अनिल देशमुख हे गृहमंत्री (Home Minister) होते, त्यांना अटक (Arrest) केली.
त्यांच्या विरोधात चार्जशीट (Charge Sheet) दाखल केली. त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा आरोप करण्यात आला.
नवाब मलिक यांची काय चूक होती? 20 वर्षापूर्वी काही व्यवहार झाला होता.
दिल्लीतील उपमुख्यमंत्र्यावर कारवाई केली जात आहे. चुकीचे काम केले तर आमचे समर्थन नाही.
केंद्र सरकारडून ईडी, सीबीआयला (CBI) सोबत घेऊन काम करत असल्याचे शरद पवार म्हणाले.

 

Web Title :-  NCP Chief Sharad Pawar |ncp chief sharad pawar criticize bjp govt over ed and cbi action in maharashtra on political leader

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Ring Road | पुणे : रिंगरोड बाधितांना मिळणार तात्काळ मोबदला

 

 

7th Pay Commission | नवरात्रीपूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणार भेट? DA Hike सह होऊ शकतात या 3 घोषणा!

 

Gold-Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा झाला बदल, जाणून घ्या नवीन दर