NCP Chief Sharad Pawar | काही निर्णय अजून व्हायचे आहेत, न्यायालयाच्या निकालानंतर शरद पवार यांचे सूचक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नैतिकता आणि भाजपचा (BJP) काही संबंध आहे असे वाटत नाही. ज्यांच्या नावावर निवडून येतात त्या पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे. काही निर्णय अजून व्हायचे आहेत, अध्यक्षांना नियमांच्या चौकटीत राहून काम करावे लगते, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. यानंतर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, काही निर्णय अजून व्हायचे आहेत, असं मला वाटतं. राज्यकर्त्यांविरोधात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. राज्यापालांची भूमिका चुकीची होती हे कोर्टाने नमूद केलं आहे. घटनात्मक संस्थांनी आपली जबाबदारी निष्पक्षपणे पार पाडायची असते. राज्यपालांची भूमिका चुकीची राहीली याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं. आता तत्कालीन राज्यपाल राज्यात नाहीत, त्यामुळे फार चर्चेला अर्थ नाही, असंही शरद पवार म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेल्या राजीनाम्यावर विचारले असता शरद पवार म्हणाले,
उद्धव यांच्या राजीनाम्याबाबत आता चर्चेला काहीच अर्थ नाही. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात राजीनाम्याबाबत
सविस्तरपणे लिहिलं आहे. मी मांडलेल्या भूमिकेवर काही मित्र नाराज झाले होते. त्यावर आता चर्चाला काही अर्थ नाही.
शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्रपणे जोमाने काम करु असेही
शरद पवार यांनी सांगितले.

Web Title :-  NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar first reaction on supreme court vedict on maharashtra political crisis uddhav thackeray ekanth shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhagat Singh Koshyari | ‘मी जे काही निर्णय घेतले ते…’, न्यायालयाने झापल्यानंतर कोश्यारींची प्रतिक्रिया

CM Eknath Shinde | घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना न्यायालयाने कालबाह्य केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडिओ)