NCP Chief Sharad Pawar | गटबाजीचा पक्षाला फटका, कार्यकर्त्यांनी केली थेट शरद पवारांकडे तक्रार; केली ‘ही’ मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी महापालिका (Municipal), विधानसभा (Vidhan Sabha) आणि लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्षाने आगामी निवडणुकांसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनीही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांसोबत आज निसर्ग मंगल कार्यालयात बैठक घेतली.

या बैठकीला जिल्ह्यातील तीन आमदार उपस्थित होते. मावळचे आमदार सुनील शेळके (Maval MLA Sunil Shelke), शिरूरचे आमदार अशोक पवार (Shiru MLA Ashok Pawar) आणि आंबेगाव तालुका मतदारसंघाचे दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, गटबाजीमुळे वेल्हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी थेट शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. पक्षातील गटतट दूर झाले तर आगामी जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समिती निवडणुकीत (Panchayat Samiti Elections) राष्ट्रवादीची सत्ता येईल असे कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सांगितले.

 

भोर वेल्हा मुळशी मध्ये राष्ट्रवादीत मोठी गटबाजी सरु असून कुणालाही तिसरी टर्म देऊ नये, अशी मागणी कार्य़कर्त्यांनी शरद पवारांकडे केली. तालुक्यात अनेक लोक संघटना आणि नेत्यांना मानतात. आघाडी धर्म असल्याने काँग्रेसचे आमदार लक्ष देत नाही. भोर वेल्हा मुळशी तालुका अजितदादांकडे द्या. सुप्रियाताई सगळ्यांना समजूतदारपणा दाखवतात. पण दादा सगळ्यांना ओळखून आहेत. ते सगळ्यांना नीट करतील असं साहेबांना सांगितल्याचे एका कार्य़कर्त्याने सांगितले.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP National President JP Nadda) हे महाराष्ट्राच्या
दौऱ्यावर असून त्यांनी शिंदे गटासोबत युतीत लढून 45 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
भाजपने 2024 च्या निवडणुकांसाठी मोठी तयारी सुरु केली आहे.
शिंदे गटातही मातब्बर कार्यकर्ते आणि इतर पक्षातील पदाधिकारी प्रवेश करीत आहेत.
मनसे (MNS) कडून पक्ष मजबूत करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
काँग्रेसच्या भरत जोडो यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
शिवसेनेने सुषमा अंधारे (Shiv Sena Sushma Andhare) आणि संजय राऊत (Sanjay Raut) या दोन
फायर ब्रँड नेत्यांना मोकळीक दिली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे काय
रणनिती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar meeting in pune with party leaders and workers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्विटवरुन चंद्रशेखर बावनकुळे संतापले, म्हणाले- ‘इतका नीचपणा…’ (व्हिडिओ)

Rohit Pawar | ‘#जी’ वरून चंद्रशेखर बावनकुळे आणि रोहित पवार यांच्यात रंगलं ट्वीटरवॉर