NCP Chief Sharad Pawar | मविआमध्ये जागा वाटपाबाबत कोण निर्णय घेणार?, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर आघाडीतील जागा वाटपावर तिन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे भाष्य केलं. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आगामी निवडणुका एकत्रपणे लढवायच्या यावर एकमत झाल्याचे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सांगितले.

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) पुढे म्हणाले, तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यामध्ये काही अडचण आली तर मी, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) किंवा सोनिया गांधी (Sonia Gandhi) निर्णय घेणार, असे सिल्व्हर ओकवर झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. आघाडीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष कोणता, दुसऱ्या क्रमांकाचा कोणता याला महत्त्व नाही. माझ्यासाठी सगळेच पक्ष महत्त्वाचे असल्याचे सांगत शरद पवारांनी लहान भाऊ-मोठा भाऊ वादावर पडदा टाकला.

 

राष्ट्रवादीच्या 10 नेत्यांची चौकशी झाली

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडीच्या चौकशीवर (Jayant Patil ED Inquiry) बोलताना शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या दहा नेत्यांची आतापर्यंत चौकशी करण्यात आली आहे. अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) नाहक तुरुंगवास घडला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai CP) परमबीर सिंह (IPS Parambir Singh) यांच्याविरोधात कितीतरी तक्रारी दाखल आहेत. त्याची यंत्रणांनी नोंद घ्यावी. राज्यात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु असून हा गैरवापर कसा होतोय हे दिसून येत असल्याचे शरद पवार म्हणाले.

 

मालिकांची भूमिका सत्यावर आधारित

Advt.

माजी एनसीबी अधिकारी (Former NCB Officer) समीर वानखेडे (Sameer Wankhede)
यांची सीबीआयकडून चौकशी (CBI Inquiry) सुरु आहे. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले,
सीबीआयने चौकशी सुरु केल्यानंतर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी घेतलेली भूमिका सत्यावर आधारित होती.
समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांची किंमत मलिकांना चुकवावी लागली असे शरद पवार यांनी म्हटले.

 

Web Title : NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar on ncp leader jayant patil ed enquiry and other political issue

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा