NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करुन एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिल्याची प्राथमिक माहिती कळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करुन शरद पवार यांना देशी कट्ट्याचा वापर करून ठार मारण्याची धमकी दिली आहे. सिल्व्हर ओकवर तैनात असलेल्या फोन ऑपरेटरने या घटनेसंदर्भात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.

सोमवारी शरद पवार यांचा ८३ वा वाढदिवस साजरा झाला. त्यांनंतर दुसऱ्या दिवशी त्यांना धमकीचा फोन आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Web Title :- ncp chief sharad pawar recieved threat calls from unknown man Silver oak

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट

PM Narendra Modi | अरब देशातील कचराकुंडीवर चक्क PM मोदींचा फोटो

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

Pune Crime | पिस्तुलातून गोळी झाडून तरुणाचा बोपदेव घाटात खून

Soya For Male Fertility | सोया खाल्ल्याने पुरुषांच्या फर्टिलिटीवर परिणाम होतो का? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचा सल्ला