NCP Chief Sharad Pawar | ‘मी अनेकदा सत्ता गमावली, मात्र…’, शरद पवारांनी सांगितला ‘पुलोद’ सरकारचा किस्सा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पुण्यात (Pune) बोलताना अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी 1980 मध्ये पुलोद सरकार (Pulod Government) बरखास्त (Dismissed) झाल्याच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून (BJP) राज्यातील कायदा, सुव्यवस्था (Law and Order) बिघडली असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रपती राजवटीची भाषा केली जात आहे. यावर बोलताना शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, सरकार गेल्याने काही जण अस्वस्थ आहेत. सत्ता गेल्याने वाईट वाटणं स्वाभाविक आहे. परंतु सत्ता येत जात असते. सत्ता गेल्याने इतकं अस्वस्थ होण्याचं कारण नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला. (NCP chief Sharad Pawar slams BJP Leader)

मी अस्वस्थ झालो नाही

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) पुढे म्हणाले, सत्ता गेल्यानं अस्वस्थ होण्याचं कारण नाही. मी अनेकदा सत्ता गमावली आहे. परंतु त्यामुळे कधीही अस्वस्थ झालो नाही, असे सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी 1980 मध्ये पुलोद सरकार बरखास्त झाल्याची आठवण सांगितली. 1980 मध्ये राज्यात पुलोदचं सरकार होतं. 1980 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या शिफारशीनंतर पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले. मात्र मी अस्वस्थ झालो नाही, अशी आठवण त्यांनी सांगितली.

वानखेडेवर मॅच पहायला गेलो

पुलोद सरकार बरखास्त करण्यात आल्याची माहिती मला मुख्य सचिवांकडून (Chief Secretary) समजली. त्यानंतर मी माझ्या काही मित्रांना निवासस्थानी बोलावून घतले. सामानाची आवराआवर, बांधाबांध केली आणि दुसरीकडे राहण्यास गेलो. त्यावेळी वानखेडेवर (Wankhede) भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) कसोटी सामना सुरु होता. मुख्यमंत्री निवास (CM Residence) सोडल्यानंतर मी वानखेडेवर मॅच (Test Match) पाहण्यासाठी गेलो होतो, असे पवारांनी सांगितले.

आपल्या धार्मिक भावना स्वत: पर्यंत ठेवाव्यात

सध्या राज्यात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाद सुरु आहे. या वादावर बोलताना शरद पवार म्हणाले,
प्रत्येकानं आपल्या धार्मिक भावना स्वत:पर्यंत मर्यादित ठेवाव्यात. धर्माबद्दल असलेल्या भावनांचं प्रदर्शन नको.
मशिदीवरील भोंग्याच्या (Azaan Loudspeakers) प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारने (Thackeray Government)
सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. सर्वांनी निर्णय घेऊन समोपचारानं प्रश्न निकाली काढला तर उत्तम होईल, असेही पवार म्हणाले.

Web Title : NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar tells what happened when his
pulod government dismissed by then pm indira gandhi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ ! कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’, बलात्कार प्रकरणी FIR