NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांची मोठी घोषणा ! खासदार सुप्रिया सुळे अन् प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Chief Sharad Pawar | आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापनदिन आहे. दिल्ली येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Baramati NCP MP Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत. त्यांची निवड करण्यात आल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. (NCP Chief Sharad Pawar)
प्रफुल्ल पटेल यांच्यावर मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा आणि झारखंड राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे तर सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, तरूण-तरूणी आणि लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्यास भाग पाडले होते. सर्वांची मते लक्षात घेऊन शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला होता.
व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा
आता मात्र शरद पवार यांनी वर्धापददिनी मोठी घोषणा केली असुन खा. सुप्रिया सुळे आणि
प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड केली आहे.
Web Title : NCP Chief Sharad Pawar | NCP leader praful patel and mp supriya sule
new executive president of ncp maharashtra marathi news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Gold Rate Today | सोन्याच्या दरात किंचित घसरण; आजचा पुण्यातील भाव काय? जाणून घ्या
- MLA Varsha Gaikwad | काँग्रेसमध्ये भाकरी फिरली, भाई जगताप यांची मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरुन उचलबांगडी; वर्षा गायकवाड नवीन अध्यक्ष
- Maharashtra Politics News | एका पोलीस अधिकाऱ्यामुळे भाजप-सेना युतीत धुमसतंय?, MP श्रीकांत शिंदेंचा राजीनाम्याचा इशारा