NCP Chief Sharad Pawar | पृथ्वीराज चव्हाणांचे पक्षातील स्थान काय? ‘त्या’ वक्तव्याची पवारांनी उडवली खिल्ली

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे सातारा दौऱ्यावर असून यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan) यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) काँग्रेस उमेदवाराच्या (Congress Candidate) विरोधात आपला उमेदवार उभा केला आहे. यावरुन चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. राष्ट्रवादीचे भाजपसोबत (BJP) बोलणं सुरु आहे, ते आमच्यासोबत किती दिवस आहेत हे माहित नाही असा आरोप चव्हाण यांनी केला होता. चव्हाण यांच्या आरोपांना शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांचा समाचार घेताना शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, चव्हाण यांना त्यांच्या पक्षात काय स्थान आहे माहिती नाही, ए,बी,सी की डी हे त्यांच्याच नेत्यांना विचारा मग त्यांचे नेते सांगतील चव्हाण नेमकं कुठे आहेत, असा टोला पवार यांनी चव्हाण यांना लगावला. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांचा देखील समाचार घेतला. सामनामधून शरद पवारांवर टीका करण्यात आली होती, यावर प्रत्युत्तर देताना त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला.
अग्रलेखाला आमच्या लेखी काही महत्व नाही, आम्ही पक्षात काय करतो हे संजय राऊत यांना माहिती नाही.
आम्ही आमचं काम करत आहोत त्यांना काहीही लिहू देत. राष्ट्रवादीने अनेकांना कॅबिनेट मंत्री करुन संधी दिली.
त्यामुळे आमच्यावर कुणीही टीका केली तर आम्ही दुर्लक्ष करतो.
अशा शब्दात शरद पवार यांनी संजय राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला.
Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp president sharad pawar criticizes congress leader prithviraj chavan
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update