NCP Chief Sharad Pawar | ‘कोणी पक्ष फोडायचं काम करत असेल तर त्यांनी…’, शरद पवारांचं मोठं विधान

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – कोणी जर पक्ष फोडण्याचं काम करत असेल तर त्यांनी ते करावं, आम्ही आमची भूमिका घेऊ असं मोठ विधान राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजकीय भूमिकेविषयी चर्चा सुरु असताना शरद पवार यांनी केलेल्या या विधानाला महत्त्व आहे. अदानी प्रकरणात (Adani Case) जर विरोधी पक्ष जेपीसी (JPC) स्थापना करण्याची भूमिका घेत असतील तर मी त्याला विरोध करणार नाही, त्यांच्या सोबत असेन असंही शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सांगितलं.

 

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याशी आमची चर्चा झाली आहे. कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका (Karnataka Assembly Elections) आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांनी काही उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी आणि आम्ही लढणाऱ्या जागा वेगवेगळ्या असतील, तर सहकार्य करता येईल का? यावर चर्चा केली. आंबेडकर त्यांच्या उमेदवारांची यादी माझ्याकडं पाठवणार आहे. आमच्या उमेदवारांची यादी त्यांना देण्यात येईल. यानंतर आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ, असं शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी म्हटलं.

 

2024 च्या निवडणुक काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी आणि शिवसेना (Shivsena) एकत्र लढणार का?
वंचित आघाडीबरोबर (Vanchit Bahujan Aghadi) असेल का? यावर शरद पवार म्हणाले,
वंचित आघाडीबरोबर आमची चर्चा झाली नाही. वंचितशी आमची चर्चा कर्नाटकातील मर्यादित जागेशिवाय दुसरी कोणतीही झाली नाही.
सध्यातरी महाविकास आघाडी असून, एकत्र लढण्याची इच्छा आहे. इच्छा नेहमीच पुरेशी नसते, जागांचं वाटप अजून ठरलंच नाही.

 

शरद पवार हे रविवारी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या.
त्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आज त्यासंबंधित विषयावर बोलताना शरद पवार म्हणाले
की, जर कोणी पक्ष फोडण्याचं काम करत असेल तर त्यांनी ते कारावं. आम्ही आमची भूमिका घेऊ.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp sharad pawar on ajit pawar says will take strong stand if someone is trying to break party

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nashik ACB Trap | नाशिक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – सिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍याविरूध्द लाच प्रकरणी गुन्हा

Ajit Pawar | तिसरे अपत्य असणाऱ्या खासदार-आमदारांना अपात्र करा, अजित पवारांची केंद्राकडे मागणी

Pune News | पुणे : कृषि विभागामार्फत ‘जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची’ अभियान राबविण्यात येणार