NCP Chief Sharad Pawar | एमसीएम निवडणुकीत आशिष शेलारांना पाठिंबा का दिला? चौफेर टीकेनंतर शरद पवारांनी केला खुलासा, म्हणाले – ‘लोकांना हे माहिती नाही की…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजकारणाच्या मैदानात एकमेकांवर तुटून पडणारे सत्ताधारी आणि विरोधक नुकत्याच झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत (Mumbai Cricket Association Elections) एकमेकांच्या गळ्यात गळे घालून प्रचार करताना दिसल्याने, सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. यानंतर सोशल मीडियामध्ये सुद्धा जोरदार टीका सुरू झाली होती. या निवडणुकीत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (BJP Mumbai President Ashish Shelar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या पॅनलने निवडणूकीत विजय मिळवला. कट्टरविरोधक यानिमित्ताने एकत्र का आले यावर आता शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी खुलासा केला आहे.

 

शरद पवारांनी (NCP Chief Sharad Pawar) आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण देताना म्हटले की, आशिष शेलार हे याआधीही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष (MCA President) होते. काही क्षेत्रं अशी असतात, जिथे राजकारण आणायचे नसते. क्रिकेटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही राजकारण आणत नाही.

 

पवार पुढे म्हणाले की, खरंतर लोकांना हे माहिती नाही की मी बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष होतो, तेव्हा गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी (Narendra Modi) होते. मोदी माझ्या बैठकीला हजर होते. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हाच अरुण जेटली (Arun Jaitley) दिल्लीचे तर आत्ता केंद्रीय मंत्री असलेले अनुराग ठाकूर (Anurag Thakur) हिमाचल प्रदेशचे अध्यक्ष होते. त्यामुळे मी देशाचा अध्यक्ष आणि हे सगळे राज्यांचे अध्यक्ष असे आम्ही सर्वांनी तेव्हा एकत्र काम केले. तेव्हा लोकांना ते लक्षातही आले नाही. पण यावेळी त्याची चर्चा सुरू झाली. तात्पर्य एकच, की या ठिकाणी राजकारण आणायचे नाही.

पवार म्हणाले, खेळाडूंना प्रोत्साहित केले पाहिजे. आम्हा लोकांचे काम खेळाडूंना हव्या असलेल्या सुविधा पुरवायच्या हे आहे.
त्यांच्या खेळात आम्ही कधी पडत नाही. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सुनील गावस्कर (Sunil Gavaskar), दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar)
यांच्यासारखे उभे आयुष्य क्रिकेटला योगदान दिलेल्या लोकांच्या ज्ञानाचा उपयोग नवीन खेळाडू निवडणे आणि त्यांना तयार करणे यासाठी व्हायला हवा.
हे काम त्यांचे आहे. त्यांना उद्या स्टेडियम बांधायचे काम जमणार नाही. ते काम आमचे आहे.
कोणते खेळाडू निवडायचे हे काम त्यांचे आहे, असा खुलासा पवार यांनी केला.

 

Web Title :-  NCP Chief Sharad Pawar | ncp sharad pawar on supporting ashish shelar in mca elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | ‘… म्हणून ते हवेत गेल्यासारखं वागतात’, रोहित पवारांचा राम शिंदेंना सणसणीत टोला

Gold-Silver Rate Today | दिवाळी सणात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय, जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime | येरवड्यात पूर्व वैमनस्यातून दरबार बेकरीजवळ राहणाऱ्या तरुणाचा खून