NCP Chief Sharad Pawar | देशात सरकार बदलण्याचा मूड, आगामी बदलांसाठी ‘ही’ गोष्ट अनुकूल; शरद पवारांचं मोठं विधान

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – तीन राज्यात भाजपची (BJP) सत्ता आली आहे. भाजपकडून जोरदार जल्लोष केला जात आहे. परंतु राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी या निकालाचे विश्लेषण करताना मोठं भाष्य केलं आहे. देशाचा बदलाचा मूड आहे. बदलाचे वारे वाहत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्याचा परिमाण दिसेलच, असे सांगताना देशात कोणत्या राज्यात भाजपची सत्ता नाही याची यादी शरद पवारांनी (NCP Chief Sharad Pawar) वाचून दाखवली. मात्र आताच कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. ते बारामतीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

 

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, देशात बदलाचा सूर तयार होतोय. केरळमध्ये भाजपा नाही, तामिळनाडूत भाजपा नाही, कर्नाटकमध्ये तिथे काँग्रेस (Congress) होतं, आमदार खासदार फोडले, आता भाजपा आहे. याशिवाय देशातील दिल्ली पंजाब, प.बंगाल, हिमाचल प्रदेश या राज्यात भाजप नाही. सगळं चित्र दिसतंय ते देशात बदलाचं वारं असल्याचा. पोटनिवडणूक, विधान परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेतील निकाल हेच सांगतात की भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. देशातील अनेक राज्यात भाजप नसल्याने ही गोष्ट आगामी बदलांसाठी अनुकुल असल्याचे पवार म्हणाले.

 

कसबा पेठ पोटनिवडणुकीवर (Pune Kasba Peth Bypoll Election) बोलताना शरद पवार म्हणाले, हा बदल आहे. आम्ही जी मतांची माहिती घेतली, त्यावरुन फक्त दोन ठिकाणी भाजपला जास्तीची मतं मिळाली. नाहीतर सरसकट सगळीकडे भाजप मागे आहे. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ अशा बहुसंख्य ठिकाणी रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) जास्तीची मते मिळाली आहेत. हा बदल आहे. हा बदल पुण्यात होतोय याचा अर्थ लोक वेगळ्या विचारात आहेत हे स्पष्ट होतं, असे पवार यांनी म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाचा चागंला निर्णय
निवडणूक आयोगासंबधी (Election Commission) काही शंका राजकीय पक्षांनी उपस्थित केल्या होत्या.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या प्रक्रियेत बदल केला आहे.
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत आता पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेत्याचा समावेश असणार आहे.
हा संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp sharad pawar warns bjp on kasba bypoll election result ravindra dhangekar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | दत्तनगर परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 8 जणांवर कारवाई

Pune PMPML News | फुकट्या प्रवाशांना पीएमपीएमएलचा दणका, दंडाच्या रक्केम मोठी वाढ

PMPML | पीएमपीएमएलच्या ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत प्रवास, 8 मार्च पासून बससेवा पुर्ववत